पांढरे झालेले केस आणि दाढी झटपट करा काळे!!

Spread the love

सध्याची बदललेली जीवनशैली, धकाधकीचे जीवन, आणि fast food मुळे झालेली रोजच्या आहारातील अनियमितता अश्या अणेक कारणाने माणसाचे अकाली वयातच केस आणि दाढी पांढरे होणे हे सामान्य झाले आहे. तुम्हाला जर तुमचे दाढी आणि केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असेल तर तुमचे दाढी आणि केस काळे करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी ठरतील असे उपाय सुचवले आहे ते नक्की करून बघा….

आजकाल लहान वयातच लोकांचे केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी 20 व्या वर्षी च तरुणांचे दाढी आणि पांढरे केस झाल्याचे दिसून येत आहेत याला अनेक कारणे आहेत ते पुढीलप्रमाणे…..

1. मेलेनीन हे द्रव्य त्वचा आणि केसासंबंधी महत्वाचे कार्य करते मेलेनीन हे त्वचे वर रंग तयार करण्यास मदत  करते या द्रव्याच्या कमी/अधिक प्रमाणामुळे केस पांढरे होतात

2. अनुवंवशिकता घरात जर अकाली कमी वयातच केस पांढरे होण्याचा पूर्वीचा इतिहास असेल तर त्या प्रमाणे घरातील लहान व्यक्तीच्या बाबतीत तसेच घडते

3. केमिकल युक्त गोष्टीचा वापर हे एक कारण असू शकते. तसेच शाम्पू , केसांना लावण्यात येणारे केमिकल युक्त मेहंदी चा अतिरेक अश्या गोष्टी पांढरे केस होण्याचे कारण ठरू शकतात

….. चला तर आता बघू दाढी आणि केस नैसर्गिकरित्या काळे  करता येतील असे सोपे आणि घरघुती उपाय

  • आवळा : आवळा चूर्ण एक प्रभावी असे चूर्ण आहे आवळा चूर्ण रोज सकाळी अमावस्या पोटी एक चमचा पाण्यातून घेतल्यास बराच फरक दिसून येईल
  • शिकेकाई : शिकेकाई ही रात्री लोखंडी भांड्यात (तवा,कढई )पाण्यात भिजत ठेवा व सकाळी ते पाणी उकळून घेऊन दाढी केसांना लावा हा उपाय नियमित आठवड्यातून दोनवेळेस जरी केला तरी फरक जाणवेल
  • तुरटी : दाढी चे केस काळे करण्यास अत्यंत प्रभावी अशी तुरटी आहे प्रथम तुरटी बारीक करून त्याची पावडर बनवून घ्या नंतर त्यामधे गुलाबजल मिक्स करून ते मिश्रण दाढी ला लावा यामुळे निश्चितच दाढीचे केस काळे होण्यास मदत होईल
  • जास्वंद : जास्वंदीचे फुल व पाने घेऊन ते खोबरेल तेलात चांगले उकळून घ्यावे आणि थंड झाल्यावर केस धुवायच्या 1 तास आधी लावावे
  • कडीपत्ता : खोबरेल तेलात कढीपत्ता उकळून घ्यावा व नंतर ते मिश्रण दाढी ला लावावे याने दाढी चे केस काळे होण्यास सुरुवात होईल
  • पपई : अर्धी पपई घेऊन त्यात चुमूटभर हळद आणि चमच्याभर कोरफडी चा गर मिक्स करून घ्या व ते मिश्रण दाढीला लावा असे आठवड्यातून दोनदा करा याने नक्कीच चांगला फायदा होईल

वरील सर्व उपाय हे नैसर्गिक असल्याने कोणताही दुष्परिणाम त्वचेवर जाणवणार नाही वरील उपाय केल्याने नक्कीच फरक जाणवेल तरीही या घरगुती उपायांबाबत शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका……

 

 


Spread the love
Posted in Uncategorised