PCOD/PCOS म्हणजे काय? तो कसा टाळता येऊ शकतो? Pcod/Pcos याचे लक्षण, कारण आणि उपाय

Spread the love

दोन वेळेस व्यवस्थित भूक लागली आणि एक वेळेस पोट साफ होणे तसेच रात्री शांत झोप लागणं  म्हणजे आपलं शरीर हे निसर्गनियमाप्रमाणे चाललेला आहे असं मानलं जात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे शरीर चालत असेल तर ते शरीर निरोगी आहे असं आपण समजलं पाहिजे . स्त्री च्या शरीरामध्ये अजून एक निसर्गचक्र असते ते म्हणजे मासिक पाळीचं ही पाळी महिन्याच्या महिन्याला येणं हे म्हणजे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. परंतु ही पाळी जर महिन्याच्या महिन्याला येत नसेल तर मात्र ते रोगाचं लक्षण आहे. आजाराचं लक्षण आहे हे समजलं जाईल त्यामुळे  स्त्रियांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे. अश्या या अनियमितता निर्माण होणाऱ्या प्रकारालाच PCOD/PCOS म्हणतात.

PCOD म्हणजे काय?

PCOD म्हणजे Polycystic Ovarian Disease  ही एक महिलांच्या बाबतीतील अनियमित मासिक पाळीमुळे आलेली अवस्था असते. लक्ष्यात घ्या ही एक अवस्था आहे रोग नाही.या मधे परिपक्व स्त्री बिजांची निर्मिती वेळेवर होत नाही यामुळे गर्भधारणेत अडसर निर्माण होतो.

सोप्या भाषेत समजून घ्यायच झालं तर ही आजकाल च्या अनेक स्त्रियांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे जि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि त्यामुळे स्त्रियांच्या शरीरातील पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण वाढून अंडाशयात गाठी तयार होऊ लागतात.  त्यामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही अनियमित होते.

PCOD ची लक्षणे :

आयुर्वेदानुसार वात आणि कफ या दोन गोष्टींच प्रमाण कमी अधिक झाल्यास अशाप्रकारे पाळी महिनोनमहिने न येणे अंगावरून कमी जाणे, पाळी मध्ये प्रचंड अनियमितता असे प्रकार सुरू होतात

 • शरीरा ची स्थूल ता वाढत जाणे
 • अंगावरून कमी जाणे.
 • पाळी मध्ये प्रचंड अनियमितता.
 • ओटीपोटात वेदना होणे
 • सारखी चिडचिड होने 
 • मूड बदलणे
 • थकवा जाणवणे
 • वजन वाढणे
 • त्याच बरोबर रक्तदाबाचा त्रास 

ही सारी लक्षणं प्रामुख्याने असलेला आजार म्हणजे पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसिस हा आजार बऱ्याचपैकी आजकाल वाढताना दिसतोय. तुमच्या आजी/ पणजी ला आई ला सुद्धा या आजारा बद्दल जास्त माहिती नसेल हे नक्की त्या सुद्धा कदाचित म्हणत असतील की हा काही नवीन आजार आहे का?

PCOD/PCOS वाढण्यामागचे कारणे आणि परिणाम ?

गेल्या दोन ते तीन दशकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे नेमकं या वाढीमागच कारण काय?

 •  स्त्रियाची बदललेली जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे पूर्वीचा काळ थोडा डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्ष्यात येईल कि पूर्वीच्या काळी स्त्रिया चुलीच्या समोर बसून स्वयंपाक करत असत आडातील पाणी काढून आणत असत, जात्यावर दळण करणे अशी कष्टाचे कामे करत असत त्याचप्रमाणे आडातून पाणी काडणे हे सुद्धा असाच एक मोठा व्यायाम आहे. जमीन खाली बसून झाडणे किंवा खाली वाकून झाडणे, घर सारवण्यासाठी सुद्धा खाली बसावं लागतं  पण आता ही परिस्थिती राहिली नाही त्याची जागा किचन ओट्याणे घेतली किचन ओट्यापाशी उभं राहून काम करणं खाली न वागता कामे करणे, फरशी पुसणं, डायनिंग टेबल वर जेवायला बसणे अश्या शारीरिक कसरतीचे कामे यामुळे कमी झाली आहेत. करिअर आणि शिक्षण याच्या मागे धावता धावता स्त्रिया खाली वाकून काम करायचं विसरून गेल्या आहेत. यामुळे ओटीपोटावर जो भार पडायला पाहिजे तो पडत नाही. स्त्रियांच्या ओटी-पोटावर भार पडून ओटीपोटाला व्यायाम होणं हे फार गरजेचं असतं. याचं कारण की स्त्रियांच्या ओटीपोटामध्ये दोन महत्त्वाच्या व्यवस्था जे कि स्त्रीचं स्त्रीत्व टिकवत असतात . एक म्हणजे गर्भपिशवी आणि दुसरं म्हणजे बीजांडकोष. याला आजच्या भाषेत मोहरी असं म्हणतात.
 • जीवनशैली आणि ताणतणाव या सगळ्या मुळे  हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात हे कुठले न कुठले हर्मोन गडबड होतात. या मधे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स येतात त्यात पहिला म्हणजे स्टडी हॉल नावा चा हार्मोन असतो. त्याची पातळी वाढते. दुसरा म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग. हॉर्मोन म्हणजे एफएक्स ह्या ची पातळी कमी होते
 • इन्शुरेंस हार्मोन जसं असे आहे की ज्या इन्शुलिन चा संबंध डायबिटीस शी आहे या इन्शुलिन ची या हार्मोन ची पातळी सुद्धा शरीरामध्ये वाढते. यामुळे प्रो लॅक्टिन हार्मोन सुद्धा वाढतो. अँड्रॉइड म्हणजे टेस्टेस्टेरॉन याची पातळी देखील वाढते. अशा प्रकारे प्रचंड उलथापालथ या हॉर्मोन्स मध्ये या आजारा मध्ये होत असते.
 • जेव्हा इन्सुलिनचे प्रमाण वाढते त्यावेळी एन्डरोजण चे प्रमाण वाढते आणि यामुळे हार्मोनल च्या असंतुलित पणामुळे स्त्रीयांमध्ये वंधत्व वाढते
 • काही स्त्रियांच्या बाबतीत अनुवांशिकता हे देखील PCOD असण्याचे कारण असू शकते त्यात आणखी भर म्हणजे स्त्रियांची अस्वस्थ होत चाललेली जीवनशैली बाहेरील पॅकेट फूड चे वाढते प्रमाण, सिगारेट आणि दारू चा अतिरेक या कारणाने देखील PCOD च्या समस्येला तोंड द्यावे लागते.
 • तसेच रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ, रस्त्यावरील तळलेले पदार्थ खाणे, अति प्रमाणात मांसाहार करणे. हे देखील शरीराचे वजन वाढण्यास पूरक गोष्टी आहेत त्यामुळे याचा थेट परिणाम स्त्रियांच्या मासिक पाळीच्या बाबतीत होतो.

PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे?

PCOD  म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर तर PCOS म्हणजे  पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या दोन्ही त फरक एवढा च आहे कि PCOD ही एक स्थिती आहे जी कि स्त्रियांच्या मासिक पाळी वर आघात करते तर PCOS हा एक मॅटोबॉलिक विकार आहे हा विकार मुख्यते ओव्हरी च्या संबंधित आहे PCOD पेक्षा PCOS हा गंभीर विकार आहे आताच्या काळात बऱ्याच स्त्रियांना हा विकार असल्याचे दिसून येत आहे पण घाबरून  जाण्याचे कारण नाही PCOD/PCOS हे जीवनशैली बदलून तसेच योग्य प्रकारचा आहार घेऊन याच्यावर मात केली जाऊ शकते

PCOD/PCOS हा विकार कसा टाळू शकतो?

नियमित व्यायाम : नियमित कसरत करणे हे PCOD /PCOS असणाऱ्या स्त्रियांना खूप गरजेचा असतो पण व्यायाम करायचा म्हणजे अति तीव्रतीचा व्यायाम करू नये जास्तीक जास्त चालणे, योगा, ध्यानधारणा, प्राणायाम अश्या प्रकारचे सौम्य प्रकारचे व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच शारीरिक कसरती बरोबरच मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहणे गरजेचे आहे तसेच मन शुद्ध असणे देखील गरजेचे आहे त्यासाठी ध्यानधारणा नियमित केली पाहिजे त्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल

तणावरहित राहणे : PCOD असणाऱ्या स्त्रियांनी ताण -तणावापासून लांबच राहायला हवे. स्त्रियांना लवकर मुल होत नसेल तर स्त्रियां ह्या मानसिक ताण घ्यायला सुरुवात करतात अश्याने हा आजार आणखी बळावतो. हे टाळणे गरजेचे आहे यासाठी मोकळ्या वातावरणात फिरायला जाणे, सकारात्मक विचार करणे, योगसाधना करणे अशे पर्याय तणावापासून दूर राहण्यास निश्चितच मदत होईल

संतुलित आहार घेणे : PCOD असणाऱ्या स्त्रियांसाठी सकस आहार घेणे खूप गरजेचे असते. फळे, पालेभाज्या, प्रथीने, दूध असे प्रकारचा सर्वसमावेशक आहार घ्यावा या मुळे शरीरातील इन्सुलिन चे वाढलेले प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते

हवाबंद खाद्यपदार्थ खाणे टाळणे : हवाबंद /प्रक्रिया केलेले पदार्थ यात साखरेचे आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. त्या पदार्थावर अनेक रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात तसेच असे पदार्थ बरेच दिवसाचे बनवलेले असतात अश्या खाद्यपदार्थामुळे PCOD असेल तर त्यात आणखी वाढ होऊ शकते

PCOD /PCOS वरील उपचार :

आजकालच्या स्त्रियांना PCOD/PCOS हा आजार होणे सामान्य झालं आहे. 18 ते 35 या वयोगटातील स्त्रियांना हा आजार होत असल्याच दिसून येत आहे या रोगावर किंवा स्त्रियांच्या या स्थिती वर उपचार उपलब्ध नाहीत. परंतु उपचार नाही म्हणून काही घाबरून जायचे काही कारण नाही. उपचार नसले तरी PCOD/PCOS चे निदान लवकर झाल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि स्त्रियां ह्या वंद्धत्वा वर मात करू शकतात. जेव्हा केव्हा PCOD /PCOS चे निदान होईल त्या दिवसापासून स्त्रियांनी थोडे सतर्क राहिले पाहिजे, आणि त्याच्यावर मात करण्यासाठी रोजच्या दिन चर्येंत बदल करावा आणि योग्य प्रकारे आहार घ्यावा. तसेच तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले औषधपचार, व्यायाम, या सर्व गोष्टींचे पालन करावे. गर्भधारणे संबंधी  अडचण असल्यास तुमच्या डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे IVF या पद्धतीने तुम्ही ही अडचण दूर करू शकता.

मित्रांनो,PCOD/PCOS ह्या प्रकारच्या समस्या येऊच नये यासाठी तुम्ही लहानपनापासूनच तुमच्या मुलींना तुम्हाला जर लहान बहीण असेल तर त्यांना व्यायाम, योगा, प्राणायाम करण्याची सवय लावा तसेच ध्यानधारणा करायला शिकवा कि जेणेकरून पुढे जाऊन अश्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होणार नाहीत. सध्याच्या काळात ही समस्या साधारण प्रत्येक स्त्रीला  असल्याच दिसून येत आहे. या मुळे या समस्ये वर मात करायची असेल तर लहानपणापासूनच मुलींना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. धन्यवाद…..


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *