CIBIL Score म्हणजे काय? Cibil score वाढवण्यासाठी काय करावे ?

Spread the love

मित्रांनो, आपल्याला आयुष्यात अनेक गरजा असतात, अनेक स्वप्न असतात परंतु पैशाच्या अभावामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करावे लागते.काही लोक अश्या गरजा पूर्ण करण्याकरिता  कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे लोन घेण्याची गरज पडत असते. जसे की घरांसाठी लोन,चार चाकी गाडी घेण्यासाठी लोन, पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) , क्रेडिट कार्ड लोन, बिझनेस लोन (व्यवसायासाठी कर्ज )वगैरे वगैरे  यापैकी कोणतेही लोन घेताना बँक सर्वात आधी आपला सिबिल स्कोअर तपासून बघते.

मित्रांनो, तुम्हाला कोणतेही एखादे प्रकारचे कर्ज म्हणजे लोन पाहिजे असेल तर तुम्हाला सिबिल स्कोर बद्दल माहिती असायला हवी. सिबिल स्कोर जास्त असण्याचे काय फायदे काय असतात सिबिल स्कोर जास्त असल्यास भविष्यात आपल्याला कोणत्या प्रकारे फायदा होऊ शकतो. ह्याची माहिती असणे आवश्यक आहे.सिबिल स्कोअर म्हणजे काय? सिबिल स्कोर कुठे कुठे वापरला जातो? सिबील स्कोर कसा काढला जातो? सिबील स्कोर कुठे बघायचा? ही सर्व माहिती सविस्तर पणे  बघणार आहोत.

Cibil Score म्हणजे नेमकं काय?

सिबिल स्कोर चा फुल फॉर्म आहे. क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. तसेच सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर सुद्धा म्हटले जाते.  ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड हे सिबिल स्कोअर तयार करणाऱ्या संस्थेचे नाव आहे. या संस्थेला रिजर्व बँक ऑफ इंडिया ने मान्यता दिलेली आहे. ही कंपनी प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्ती ची किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती ची आर्थिक व्यवहाराबद्दलची  माहिती ठेवते. जसे की त्या व्यक्ती वर किंवा व्यवसाया वर किती कर्ज  आहे? कर्जा चे हप्ते वेळेत फेडतो का नाही?आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे पूर्वीचे काही कर्ज घेतलेले असल्यास ते वेळेत फेडलेले आहे का नाही? वगैरे वगैरे या सर्व माहिती च्या आधारे ते प्रत्येकाचा सिबिल स्कोर काढत असतात.

ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड या कंपनीकडे आजच्या तारखे पर्यंत अंदाजे 65 कोटी वैयक्तिक आणि तीन कोटी  व्यवसाया ची माहिती जमा आहे.

Cibil Score किती असायला हवा?

भारतातील सर्व बँका त्यांच्या खातेदारांची माहिती ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड या संस्थेला देत असतात. तुमचे एकूण किती बँके मध्ये अकाउंट आहे? त्या मध्ये एकूण किती प्रकारची लोन चालू आहे? अशा सर्व प्रकारची माहिती बँका सिबिल ला पुरवत असतात. सिबिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे मध्ये काढला जातो. जेवढा तुमचा सिबिल स्कोर 900 च्या जवळ असेल तितके चांगले मानले जाते. आणि तुम्हाला लोन मिळण्यास सोपे जाते. साडेसातशे च्या वर सिबिल स्कोअर असणाऱ्यांना लवकर लोन मिळते आणि तेही चांगल्या व्याज दरात (म्हणजे कमी व्याज दारात ).कमी सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना लोन मंजूर करून घ्याय ला खूप त्रास होतो सहन करावा लागतो आणि जरी लोन मिळाले तरी त्यांना जास्त व्याजदर भरावा लागू शकतो . अनेक वेळा बँका कमी सिबिल स्कोर असणारांचे लोन नामंजूर करतात. कारण त्यांचा मागचा इतिहास पाहिला तर बँकेसाठी तो व्यवहार तोट्याचा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकांनी स्वतः सिबिल स्कोर साडेसातशे च्या वर कसं राहील यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.

Cibil Score कसा मोजला जातो?

प्रत्येका चा सिबिल स्कोअर हा मागील सहा महिन्यांच्या आर्थिक माहिती च्या आधारावर काढला जातो.सिबिल स्कोअर हा चार महत्त्वा च्या गोष्टींच्या आधारे काढला जातो.

1.पेमेंट हिस्ट्री : आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या लोन पैकी मग ते कार लोन असू द्या होम लोन असू द्या किंवा इतर कुठले ही लोन असू द्या यापैकी कुठले ही लोन चे हप्ते तुम्ही थक लेले असतील किंवा उशिरा भरले असतील तर त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होतो मित्रांनो क्रेडिट कार्ड वापरणे सुद्धा एक प्रकारे लोन घेण्या सारखेच आहे आणि क्रेडिट कार्ड ची बिलं वेळेवर न भरल्या ने सुद्धा.तुमचा सिबिल स्कोअर जास्त प्रमाणात खाली येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही लोन चे हप्ते किंवा क्रेडिट कार्ड चे हप्ते तुम्ही वेळेवर भरल्यास सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होते.सिबिल स्कोर करताना पेमेंट हिस्ट्री ला 30 टक्के प्राधान्य दिले जाते.

2. क्रेडिट एक्सपोजर : क्रेडिट एक्सपोजर किंवा क्रेडिट लिमिट म्हणजे आपण क्रेडिट लिमिट एवढी रक्कम कर्ज म्हणून वापरू शकतो. क्रेडिट कार्ड सुद्धा आपल्या ला एक प्रकारे लोन देते. जिथे आपण आधी पैसे वापरतो नंतर त्याचे हप्ते भरत असतो . अशा अनेक ठिकाणाहून आपल्याला क्रेडिट लिमिट मिळत असते . जसे की क्रेडिट कार्ड, कमर्शियल बँक , ट्रेड क्रेडिट्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, वेगवेगळे फायनॅ न्शिअल.ॲप्स वगैरे वगैरे.

आपल्याला मिळालेल्या क्रेडिट लिमिट पैकी आपण ते किती प्रमाणात वापरतो यावर सुद्धा सिबिल स्कोर अवलंबून असतो. मिळालेल्या क्रेडिट लिमिट पैकी तुम्ही जितके कमी क्रेडिट वापराल तेवढा तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होते. उदाहरण बघायचं झालं,तर क्रेडिट कार्डच च उदाहरण घेऊया. एखाद्या क्रेडिट कार्ड वर तुम्हाला 2,00,000₹ क्रेडिट लिमिट मिळत आहे आणि तुम्ही ते 2,00,000₹ चा क्रेडिट पूर्ण वापरत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होईल.आणि जर 2,00,000₹ क्रेडिट लिमिट पैकी तुम्ही फक्त 40 ते ₹60,000₹ वापरत असाल तर त्या वेळेस तुमचा सिबिल स्कोर चांगलं राहील. त्यामुळे या क्रेडिट लिमिट चा वापर गरज असेल तेव्हाच करा सिबिल स्कोर काढताना क्रेन एक्स्पो जर ला 25 टक्के प्राधान्य दिले जाते.

3. क्रेडिट टाइप : सर्वसाधारण यात  दोन प्रकारचे लोक असतात. सुरक्षित  लोन आणि असुरक्षित  लोन म्हणजे जे योग्य प्रकारे कागदपत्र तपासून आणि वेगवेगळ्या प्रकारची संमती घेतलेली  असते. यामध्ये होम लोन कार लोन, एजुकेशन लोन या प्रकारचे लोक येतात. आणि असुरक्षित  लोन म्हणजे जे जास्त कागदपत्र न तपासता आणि कुठलीही संमती न घेता घेतलेले लोन असते. यामध्ये पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज).क्रेडिट कार्ड लोन या प्रकारची लोन येतात. यापैकी जर तुम्ही सिक्युअर लोन पेक्षा जास्त अन सिक्योर लोन घेतलेले असतील तरी सुद्धा तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. पण तिथे जर तुमचे सुरक्षित लोन हे  असुरक्षित  लोन पेक्षा जास्त किंवा बरोबरीत असेल तर तुमचा सिबिल स्कोर चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे कुठलेही लोन घेताना आपण कुठल्या प्रकारची लोन घेतोय या गोष्टी चा विचार नक्कीच केला पाहिजे. सिबिल स्कोर काढताना क्रेडिट टाइप ला. 25 टक्के प्राधान्य दिले जाते.

4.कारण नसताना बँकांमध्ये कर्जासाठी केलेली विचारपूस: अनेक लोकांना लोन घेण्यापेक्षा फक्त आपल्या लोन मिळते की नाही हे जाणून घेण्यातच जास्त रस असतो तशी त्यांना सवय असते. त्यामुळे ती लोक काय करतात तर ते वेगवेगळ्या बँकांमध्ये आपली कागदपत्रे देऊन बसतात आणि आपल्याला किती लोन मिळू शकते? त्यावर व्याजदर किती मिळू शकते? लोन किती वर्षांसाठी मिळू शकते? अशी विनाकारण  सर्व प्रकारची माहिती गोळा करत बसतात . तुमची ही सर्व माहिती बँका सिबिल या संस्थेपर्यंत पोहोचवत असते आणि त्यामुळे सुद्धा आपला सिबिल स्कोअर कमी होतो.आणि जेव्हा खरे लोन घ्यायची वेळ येते तेव्हा आपला सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे लोन मिळत नाही किंवा मिळायला त्रास होतो.त्यामुळे गरज असेल तेव्हा बँक मध्ये लोन ची चौकशी करणे किंवा त्यावेळेस च लोन बद्दल ची माहिती घेणे हे सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी फायद्याची ठरू शकते. सिबिल स्कोर काढताना कर्जा साठी केलेल्या चौकशांना 20 टक्के प्राधान्य दिले जाते.

Cibil Score बद्दल माहिती कोठे भेटेल?

मित्रांनो पूर्वी सिबिल स्कोर पाहण्यासाठी पैसे लागत होते परंतु आता वेगवेगळ्या वेबसाईट, ॲप्स  हे विनामूल्य आपला सिबिल स्कोर ची माहिती देतात. तुम्ही गूगल सर्च इंजिन वर cibil score cheak एवढे जरी सर्च केले तरी वेगवेगळ्या मोफत च्या वेबसाईट उघडतील आणि तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकाल.

** सर्व ग्राहकांना एक महत्वाची सूचना **

आम्ही headlinetodays या आमच्या वेबसाईट द्वारे एक अत्यंत महत्वाची सूचना देऊ इच्छितो की, तुम्हाला जर लोन घ्यायचे असेल तर तुम्ही शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेतूनच घ्यावे. ऑनलाइन लोन, ऑनलाइन ॲप्स द्वारे लोन घेणे टाळा कारण यातून तुमची फसवणूक होण्याचा धोका असतो धन्यवाद…….


Spread the love
Posted in Uncategorised

One thought on “CIBIL Score म्हणजे काय? Cibil score वाढवण्यासाठी काय करावे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *