गुंतवणूक नेमकी कश्यात करावी? गुंतवणूकीचे विविध मार्ग!

Spread the love

           मित्रांनो…सध्या वाढत जाणारी महागाई हा एक गंभीर विषय बनला आहे. त्यात नौकरदार वर्ग, बेरोजगार, छोटे व्यवसायिक असे सर्व साधारण नागरिक वर्षानुवर्ष वाढत जाणाऱ्या महागाई ला तोंड देत आहेत. तसेच कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, महिन्याला कपात होत जाणारे घराचे हफ्ते अश्या सर्व खर्चिक समस्या सर्वसामान्य लोकांपुढे “आ” वासून  उभ्या राहतात. या सर्व गोष्टी झाल्यानंतर सामान्य व्यक्ती थोडी बचत करण्याचा विचार करतो.आणि ती केलेली बचत कुठे न कुठे गुंतवण्याचा प्रयत्न करतो.

गुंतवणूक म्हणजे नेमकं काय?

गुंतवणूक म्हणजे आपल्या महिन्याच्या उत्पनांतून मिळणारा पैसा, हा आपली महिन्याभराच्या मूलभूत गरजा भागऊन जी शिल्लक रक्कम राहते ती आपण चांगला परतावा मिळावा या साठी   विशिष्ट योजनेत गुंतवतो यालाच गुंतूवणूक म्हणतात.

   गुंतवणूक कधीपासून सुरु केली पाहिजे?

गुंतवणूकीची सुरुवात तुम्ही कधीही करू शकता त्यासाठी कोणत्याही अशा विशिष्ट वेळेची गरज नसते गुंतवणूक तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढाच त्याचा परतावा जास्त असेल.

नियमितता – गुंतवणूकीची सुरुवात लवकरात-लवकर  करावी, पण त्या गुंतवणूकीत सातत्य असायला हवे, एकदा गुंतवणूक केली आणि विसरून गेले असं होता कामा नये. तुम्ही जी काही गुंतवणूक करणार आहात ती गुंतवणूक तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने मासिक किंवा वार्षिक या तत्वावर सम – समान भागात असावी, त्या गुंतवणूकीत कोणताही खंड पडता कामा नये.

गुंतवणूकीची मुदत – गुंतवणूकीच्या बाबतीतील सर्वात मोठी चूक म्हणजे गुंतवणूक करताना केलेली कालावधीची निवड. गुंतवणूकीचा कालावधी जेवढा जास्त ठेवढा जास्त तुम्ही केलेल्या गुंतवणूकीचा परतवा असतो. तुम्ही गुंतवणूकीची रक्कम कमी ठेवा परंतु गुंतवणूकीचा कालावधी हा दीर्घकालीन असायला हवा. असे केल्यास तुम्हाला मिळणारा परतावा हा अधिक पटीने वाढतो. जेवढा तुम्ही कमी कालावधी निवडाल तेवढा तुम्हाला मिळणारा परतावा कमी असणार आहे हे लक्ष्यात ठेवा.

गुंतवणूक नेमकी कुठे करावी?

ह्या प्रश्नाचे उत्तर हे स्वतः तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मिळणाऱ्या परताव्यासाठी नेमकी किती जोखीम घेऊ शकता यावर सर्वस्व ठरलेले आहे. याचे दोन प्रकार पडतील…

1). Fixed Return (निश्चित परतावा )

2). Unfixed Return (अनिश्चित परतावा )

Fixed Return च्या बाबतीत जोखीम कमी प्रमाणात असते आणि मिळणारा नफा देखील कमी असतो.  तरीदेखील  fixed return हा एक लोकप्रिय गुंतवणूकीचा प्रकार आहे अधिकतर लोक हा पर्याय निवडताना दिसतात.

  • फिक्स डिपॉजिट (FD) – सर्वसामान्य लोकांमध्ये FD हा सर्वात आवडीचा गुंतवणूकीचा पर्याय मानला जातो कारण FD करताना आपण केलेल्या गुंतवणूकी वर आपल्याला किती रक्कम मिळणार आहे हे माहित असते FD मध्ये मिळणारी रक्कम ही ठरलेली  असते गुंतवणूक केलेली रकमेवर किती व्याजदर मिळणार हे ठरलेले असते तुम्हाला जर FD करायची असेल तर तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टामध्ये  करू शकता FD चा व्याजदर हा 3% ते 7% असतो. जेवढा जास्त कालावधीसाठी तुम्ही रक्कम गुंतवणूक कराल तेवढे जास्तीत जास्त व्याजदर मिळू शकते.FD मध्ये तुम्हाला सर्व रक्कम एक सोबत भरावी लागते.
  • रिकरिंग डिपॉजिट (RD) – ज्या लोकांना FD मध्ये एकदम मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते ते लोक RD मध्ये गुंतवणूक करतात या मध्ये तुम्ही महिन्याला थोडी थोडी रक्कम भरून गुंतवणूक करू शकता.बऱ्यापैकी FD आणि RD चे नियम सारखेच आहेत थोडाफार फरक म्हणजे RD मध्ये तुम्ही 100₹ पासून गुंतवणूक करू शकता त्याचा कालावधी 6 महिने ते 10 वर्ष असू शकतो. FD च्या तुलनेत RD मध्ये मिळणारा व्याज दर हा कमी असतो.
  • पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) – PPF मधील गुंतवणूक ही retairment plan म्हणून ओळखला जातो या मधी कमीत कमी 500₹ वार्षिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. हा प्लॅन 21 वर्ष एवढ्या दीर्घकालीन मुदतीचा असतो तुम्ही 18 व्या वर्षी या मध्ये गुंतवलेली 50 टक्के रक्कम काढू शकता PPF चा व्याज दर हा 7 टक्के असतो नवीन आलेल्या नियमानुसार PPF मधील रक्कम वैद्यकीय कारण सांगून किंवा अन्य कारण सांगुन 5 वर्षांनी रक्कम काढू शकता. PPF मधी रक्कम गुंतवल्यास तुम्ही आयकर करात सूट मिळवू शकता.
  •  नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) – NPS स्कीम ही देखील PPF सारखीच आहे या स्कीम मध्ये देखील कमीत-कमी वार्षिक 500 ₹ रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही जमा केलेला रकमेच्या 60 टक्के रक्कम रिटायरमेंट नंतर लगेच मिळते व उर्वरित 40 टक्के रक्कम ही पेन्शनच्या स्वरूपात दर महिन्याला देण्यात येते. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तुम्हाला नऊ ते दहा टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्हाला जर साठ वर्षाच्या आत काही झाले तर जमा झालेले रक्कम ही तुमच्या वारसांना देण्यात येते

मित्रांनो…. वरील सर्व फिक्स रिटर्न देणारे गुंतवणुकीचे मार्ग आहेत. परंतु ज्या गतीने महागाई वाढत आहे. त्या तुलनेत फिक्स रिटर्न देणारे गुंतवणुकीचे मार्ग यांचे व्याजदर कमी आहेत व ते जास्त वाढत नाहीत तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे जोखीम घ्यायची नसेल तर तुमच्यासाठी वरती दिलेले गुंतवणुकीचे पर्याय योग्य आहेत

Unfixed Return (अनिश्चित परतावा ) –

अनिश्चित परतावा या गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीचा निश्चित असा परतावा नसतो या गुंतवणुकीमध्ये तुमचे नुकसान देखील होऊ शकते परंतु फायदा जर झाला तर तो सुद्धा अनिश्चित असतो म्हणजे तुम्ही विचार कराल त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक नफा तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला फक्त गरज आहे ती परिपूर्ण अभ्यासाची व भविष्य ओळखण्याची भविष्यात कोणत्या गोष्टीला महत्त्व येऊ शकते पाच वर्षांनी दहा वर्षांनी कोणत्या गोष्टीला महत्त्व येऊ शकते याचा अंदाज बांधता आला पाहिजे.

  • रियल इस्टेट – रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक म्हणजे तुम्ही घर, जमीन, फ्लॉट विकत घेऊन त्या मालमत्तेची रक्कम वाढल्यास विकू शकतात रिअल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक हे त्या जागेच्या भविष्यात होणाऱ्या विकासावर अवलंबून असते. यामध्ये काही अपवाद  सोडला तर रिअल इस्टेट मधील गुंतवणूक अमर्याद असा नफा मिळवून देते. कारण जागा ही मर्यादित आहे आणि लोकसंख्या वाढत च चालली आहे पण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात रक्कम असणे आवश्यक आहे
  •  सोन्यामधील गुंतवणूक – आपल्या देशात सोन्यातील गुंतवणूकीला खूप महत्व दिले जाते सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते मागील 10 ते 15 वर्षात सोन्यातील गुंतवणूकदाराणा 200 ते 250 टक्के नफा मिळून दिला आहे.सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिने घेण्यापेक्षा सोन्याची वळ किंवा सोन्याचे बिस्कीट विकत घ्यावे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट होत नाही व अधिकचा नफा मिळतो. तसेच तुम्ही सोन्याच्या बॉण्ड मध्ये देखील गुंतवणूक करू शकता
  •  म्युचुअल फंड – सध्या  म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. या मध्ये बऱ्याच पैकी तरुणांचा सहभाग वाढताना दिसत आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना या मधील जोखमीची माहिती तुम्हाला असायला हवी. संपूर्ण गोष्टींचे ज्ञान असायला हवे.म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकी आदी तज्ज्ञचा सल्ला घेतला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये 1.Equity Fund, 2.Debt Fund 3.Hybride Fund असे प्रकार आहेत या मध्ये तुम्ही जेवढी जास्त रिस्क घ्याल तेवढा जास्त तुम्हाला नफा मिळू शकतो
  • शेअर मार्केट – कोरोना सारख्या महामारी नंतर लोकांचा शेअर मार्केट कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जास्तीक – जास्त लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. आणि त्यातून अधिकचा नफा कामावताना दिसत आहेत. तसेच काही लोक ट्रेडिंग करून पैसा कमवत आहेत. परंतु स्टॉक मार्केट च्या सेबी या संस्थेच्या एका अहवालानुसार 10 पैकी 9 लोक हे तोट्यात आहेत म्हणजे फक्त 1टक्का लोक हे नफा कमवत आहेत त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना चांगला अभ्यास करूनच पैसे गुंतवण्याचा विचार करावा.शेअर मार्केट मधून वाट्टेल तेवढा पैसा कमवता येतो पण त्या साठी थोडा अभ्यास, थोडा वेळ तसेच संयम बाळगणे महत्वाचे आहे.

मित्रांनो वरती दिलेले सर्व गुंतवणूकीचे मार्ग यांचा चांगला अभ्यास करावा आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्यावा. आणि त्या नुसार गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा..

 


Spread the love
Posted in Uncategorised

One thought on “गुंतवणूक नेमकी कश्यात करावी? गुंतवणूकीचे विविध मार्ग!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *