Mutual Fund म्हणजे काय? श्रीमंत होण्याचा सर्वात सोप्पा व सुरक्षित मार्ग..

Spread the love

मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे एकसारख्या लोकांनी किंवा काही लोकांनी मिळून एकाच फंड मधे किंवा एकाच ठिकाणी केलेली गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड होय. आजकाल च्या महागाईच्या काळात योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करने महत्वाचे आहे तर च आपल्याला त्याचा योग्य तो परतावा चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि आपण कायम महागाई च्या तुलनेत एक पाऊल पुढे राहू शकतो. सध्या महागाई चा दर 4.25 % आहे (मे 2023 च्या आकडेवारी नुसार ) तोच दर नोव्हेंबर 2022 रोजी 5.85% इतका होता म्हणजेच काय महागाई दर सारखा बदलत असतो परंतु तो साधारण सरासरी काढली तर 5 % ते 6 % इतका असतो.

 

मित्रांनो मग विचार करा कि तुम्ही ज्या बँकेत फिक्स डिपॉसिट केले आहे ती बँक किती व्याजदर देते?..तर ती सुद्धा 5.50 ते 6 % इतका व्याजदर देते इतका च जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकी वर परतावा मिळत असल तर तुम्हाला महागाई च्या तुलनेत मिळणारा परताव 0 % होईल. याचाच अर्थ महागाई तर वाढत चाललीय परंतु तुमचा पैसा काही वाढत नाहीय तो एकाच जागी स्थिर आहे. ही गोष्ट गुंतवणूक करताना विशेष लक्ष्यात घेण्यासारखी आहे.

 

तुम्हाला जर तुमच्या कडील पैश्याचा योग्य तो परतवा मिळवायचा असेल आणि वाढत चाललेल्या महागाई च्या तुलनेत चांगला परतावा हवा असेल तर स्टॉक मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु त्यासाठी स्टॉक मार्केट चे ज्ञान असायला हवे. तसेच स्टॉक मार्केट चे ज्ञान मिळवण्यासाठी वेळही द्यावा लागेल. ह्या सर्व गोष्टी तर ज्या लोकांसाठी शक्य नाहीत त्यांच्या साठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे.

 

म्युच्युअल फंड काम कसे करते?

 

कोणताही म्युच्युअल फंड ही एक असेट मॅनेजमेंट कंपनी ( Asset Managment Company ) चालवत असते त्याला AMC देखील म्हणतात. ही AMC कंपनी नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे फंड बाजारात आणत असते आणि त्याची जाहिरात सोशल मीडिया, वर्तमान पत्रे, टीव्ही, शक्य होईल त्या त्या ठिकाणावरून जाहिरात करत असते जेणेकरून जास्तीक जास्त लोक म्युच्युअल फंड खरेदी करतील. म्युच्युअल फंड मधे तुम्ही 100₹ पासून देखील सुरुवात करू शकता.

 

तुम्ही समजा ज्यावेळेस एखाद्या म्युच्युअल फंड मधे 1000₹ गुंतवता त्यावेळेस तुम्हाला एक हजार रुपयांचे युनिट्स दिले जाते आणि त्या प्रत्येक युनिट्स ची एक किंमत असते त्याला नेट असेट व्हॅल्यू  ( NAV)  म्हणतात. असेट मॅनेजमेंट कंपनी ही एक फंड मॅनेजर नियुक्त करतात आणि त्या फंड मॅनेजर च्या हाताखाली एक तज्ज्ञ लोकांची टीम असते जी कि मार्केट चा पूर्णपणे अभ्यास करतात. फंड मॅनेजर आणि तज्ज्ञ लोकांची टीम निर्णय घेतात कि या फंड मध्ये आलेले पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे. त्यामुळे आपण एकदा एखाद्या फंड मध्ये गुंतवणूक केली कि त्याकडे सारखे लक्ष्य द्यायची गरज नसते. त्यासाठी तो फंड मॅनेजर आपण केलेल्या गुंतवणूकीवर आपल्या साठी लक्ष ठेऊन असतो. त्यासाठी तो 1 % ते 2% एवढी फी आकारात असतो. त्या फी लाच एक्सपेन्स रेशो  ( Expence Ratio ) म्हणतात. त्यासाठी कोणताही म्युच्युअल फंड निवडताना त्या म्युच्युअल फंड चा एक्सपेन्स रेशो किती आहे ते पाहणे महत्वाचे आहे जेवढा एक्सपेन्स रेशो कमी असेल आपल्या साठी फायद्याचे ठरते.

 

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी कराल?

 

 

म्युच्युअल फंड मध्ये आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो

 

1.  SIP : ( Systematic Investment Plan )

 

2. Lumpsum Investment :

 

तर आता बघू  SIP म्हणजे काय ?

 

SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना  होय. SIP मध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम नियमित पणे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. SIP द्यारे तुम्ही प्रत्येक महिन्याला , प्रत्येक तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला तुम्हाला जमेल तशी तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही कमीत – कमी पाचशे रुपयांपासून सुरुवात करू शकता. तुम्हाला चांगल्या प्रकारे गुंतवणूकीचा परतावा हवा असेल तर तुम्ही जी काही गुंतवणूक सुरु केली आहे म्हणजे मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही  यात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये. म्युच्युअल फंड प्रमाणेच तुम्ही स्टॉक मार्केट मधेही SIP करू शकता परंतु तुम्हाला स्टॉक मार्केट च ज्ञान असायला हवे.

 

2. Lumpsum गुंतवणूक कशी असते?

 

Lumpsum गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या कडे अधिक प्रमाणात पैसे असायला पाहिजे. Lumpsum गुंतवणूक म्हणजे एकदम पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा तुमच्या कडे गुंतवणूक करण्यासाठी पन्नास हजार रुपये आहेत तर तुम्ही ते तुकड्या न मध्ये न गुंतवता एकदम पन्नास हजार रुपये तुम्ही निवडलेल्या फंड मध्ये एकसोबत टाकणे.

आता  तुम्ही म्हणाल Lumpsum या प्रकारातील गुंतवणूक कधी करावी तर या साठी तुम्हाला स्टॉक मार्केट चे थोडेसे का होईना ज्ञान असायला हवे मार्केट ज्या वेळेस अप ट्रेंड मध्ये असेल म्हणजे वरच्या दिशेने जात असेल त्या वेळेस गुंतवणूक करण्याचे टाळावे ज्या वेळेस मार्केट मध्ये 2 % ते 5% एवढा एखाद्या लेवल पासून खाली आलेले असेल त्या वेळेस तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे त्यात पण एकदम संपूर्ण पैसे गुंतवून टाकू नका गुंतवणूक करताना चार टप्यात गुंतवणूक करावी. म्हणजे उदाहरण देयचं झालं तर……

समजा तुमच्या कडे laumpsum गुंतवणूक करण्यासाठी एक लाख रुपये आहेत तर ती रक्कम एकदाच न गुंतवता पंचवीस हजार एका वेळेस गुंतवावे त्या लेवल पासून पुन्हा मार्केट खाली आले तर परत पंचवीस हजार गुंतवावे अश्या प्रकारे गुंतवणूक केल्यास तुमची सरासरी ची जी रक्कम होईल ती बऱ्याच पैकी खालच्या स्तरावर होईल  व ज्या वेळेस मार्केट वरच्या दिशेने जाईल त्या वेळेस अधिकाधीक नफा होईल.

 

 

म्युच्युअल फंडचे किती प्रकार आहेत?

 

म्युच्युअल फंडचे बरेच प्रकार आहेत त्यातले तीन महत्वाचे प्रकार बघू….

 

1. Equity Fund

 

2.Debt Fund

 

3.Hybride Fund

 

  • Equity Fund : equity फंड मधील सर्वात जास्त गुंतवणूक ही स्टॉक मार्केट मधील equity share मध्ये केली जाते. सुमारे 60 ते 70% गुंतवणूक ही स्टॉक मार्केट मधील equity share मध्ये केली जाते. व उर्वरित गुंतवणूक ही गोल्ड, बॉण्ड्स  या प्रकारात केली जाते Equity फंड मधील गुंतवणूक ही अति जोखमीची (High Risk ) असते.equity फंड मधील गुंतवणूक दारांना मागील 1 वर्षात 30 % 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात 15 % एवढ्या मोठया प्रमाणात परतावा दिला आहे.

 

  • Debt Fund : debt फंड  मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. Debt फंड मधील गुंतवणूक ही व्यवसायिक बॉण्ड्स, सरकारी सुरक्षितता, डिबेनचर्स, ट्रेजरी बिल्स, या प्रकारात केली जाते. गुंतवणूकीच्या परतव्या चा विचार करता Equity फंड पेक्षा debt फंड मध्ये परतावा कमी मिळतो परंतु सर्वात सुरक्षित पणे मिळतो. बँकेतील फिक्स डिपॉजिट चा विचार करता तेथील परतव्या पेक्षा अधिक पटीने Debt फंड उत्तम पर्याय आहे. Debt फंड ने मागील 1 वर्षात 3 % वर्षात 8 % आणि 5 वर्षात 7% एवढा गुंतवणूक दारांना परतावा दिला आहे.

 

  • Hybride Fund : हायब्रीड फंड मधील गुंतवणूक ही 50% Equity फंड आणि 50% Debt फंड मध्ये केली जाते. या मुळे equity फंड चा परतावा अधिक debt फंड चा फिक्स परतावा दोन्ही गोष्टी साध्य होतात. परताव्याचा विचार करता हायब्रीड फंड ने मागील 1 वर्षात 23% मागील 3 वर्षात 17% तसेच 5 वर्षाचा विचार करता 13% एवढे रिटर्न दिले आहेत.

 

आम्ही Headlinetodays या संकेत स्थळातर्फे एवढे च सांगू इच्छितो कि आम्ही कोणत्याही प्रकारे mutual Fund मध्ये गुंतवणूक करा तर च तुम्हाला चांगला फायदा होईल असे सांगत नाही आहोत. आम्ही फक्त mutual fund बद्दल ची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्या मते कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना कायदेशीर सल्लागाराकडून च गुंतवणूक करा स्वतः च्या म्हणण्यानुसार कोणतीही गुंतवणूक करू नका कष्टाने कामावलेला पैसा असा वाया घालवू नका.

 

SIP करताना  2 ते 3 वर्षा साठी करू नका तुम्हाला जर मोठया प्रमाणात परतावा हवा असल्यास कमीत कमी 15 ते 20 वर्षासाठी गुंतवणूक करा आणि सर्वात महत्वाचे  SIP करताना Step Up SIP चा पर्याय निवडा म्हणजे दर वर्षी काही रक्कम तुमच्या चालू असणाऱ्या SIP मध्ये वाढ होईल व परतावा देखील वाढेल. SIP च्या परतावा किती गुंतवणूक केली तर किती परतावा मिळेल किती वर्षे SIP सुरु ठेवावी या साठी तुम्ही एका SIP Calculator डाउनलोड करू शकता व त्या वरून तुम्ही सोप्या पद्धतीने गुंतवणूक व परतव्याचे गणित मांडू शकता. आणि नकीच श्रीमंत होऊ शकता गुंतवणूकीच्या काळात वाढ केल्यास कोट्याधीश देखील होऊ शकता. धन्यवाद…..


Spread the love
Posted in Uncategorised

9 thoughts on “Mutual Fund म्हणजे काय? श्रीमंत होण्याचा सर्वात सोप्पा व सुरक्षित मार्ग..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *