वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होतय,तर अश्या प्रकारे मिळेल नुकसान भरपाई!

Spread the love

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी आणि संकट यांचे अतूट, नाते पावसा अभावी पेरणी होत नाही. पेरणी झाले तर कीड रोगा चा प्रादुर्भाव होतो आणि या सर्वांमधून पिक जरी आलं तरी पुढे एक मोठं संकट समोर येतं ते म्हणजे वन्य प्राण्या मुळे शेतजमिनी चे नुकसान मित्रांना पण जर पाहिला तर महाराष्ट्रा मध्ये शेतकर्या ना भेडसावणारा हा एक महत्त्वा चा प्रश्न आहे. नीलगाय असतील रानडुकरास तील माकड असतील, हरणा असतील किंवा इतर वन्यप्राण्यां मुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि आशा जर वन्यप्राण्यामुळे शेतजमिनी चे नुकसान झालं, जनावरांचे नुकसान झालं, पशु हानी झाली तर त्याच्या साठी शासनाच्या माध्यमातून काही मदत दिली जाते. ही मदत किती दिली जाते, कश्या प्रकारे ही मदत केली जाते, ते आपण आज पाहणार आहोत. अशा प्रकारे जर तुमच्या शेतीचे नुकसान झालेलं असेल तर त्याचे नुकसान भरपाई मिळण्या साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची देखील सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्ज कोठे करावा? व अर्ज करण्याची योग्य पद्धत कोणती ?

 • सर्वप्रथम वन्य प्राण्यांच्या वास्तव्याने किंवा हल्ल्याने नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळण्यासाठी महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल  च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
 •  नंतर तुम्हाला डॅशबोर्ड वरती ऑप्शन दाखवेल किंवा लेफ्ट साइड ला पब्लिक सर्विस नावा चं ऑप्शन आहे. यामध्ये आरटीएस च्या अंतर्गत सुद्धा ऑप्शन आपल्या ला देण्यात आलेले आहेत. आरटीएस फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकाल कि वन्यप्राण्यामुळे पशुनच नुकसान , मनुष्य नुकसान याच बरोबर पाच नंबरला एक ऑपशन दिले आहे, शेती पिका च्या नुकसानी करता. या शेतीपिकाचे नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
 •  यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन अर्ज उघडल्याचे दिसेल ज्याच्या मध्ये आपल्याला मराठी मध्ये अर्जदाराचे नाव लिहायचे आहे मराठी मध्ये लिहिण्या करीता वरती आपल्या ला सपोर्ट सुद्धा दिलेला आहे किंवा तुम्ही इतर मराठी कीबोर्ड मध्ये लिहून सुद्धा ठिकाणी पेस्ट करू शकता. यानंतर मोबाईल नंबर, अर्जदार शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे. याच्या नंतर नुकसानी मध्ये जे पीक असेल त्या पिका चा प्रकार निवडायचा ह्याच्यामध्ये 1.ऊस 2. पिक 3. फलझाडं असे प्रकार आहेत.  पिक असेल तर त्यामध्येकोणते पिक  सोयाबीने उदय तूर, मूग व ज्वारी जे काही असेल तो पर्याय निवडावा.फलझाडं असेल तर फलझाडं हा पर्याय निवडून ते ते फळपिक निवडावे.
 • त्यानंतर पुन्हा एकदा खाली शेतकऱ्यांचे नाव निवडावे त्याच्या मध्ये इंग्लिश मध्ये नाव लिहल्यास ते ऑटोमॅटिक मराठी मध्ये रूपांतरित होईल आणि जर होत नसेल तर इतर की-बोर्ड च्या माध्यमातून आपण लिहून सुद्धा याच्या मध्ये पेस्ट करू शकता जर पेस्ट करून मराठी भाषेत होत नसेल तर वरती सुद्धा आपल्या ला सपोर्ट  देण्यात आलेला आहे. यामध्ये अर्जदारच नाव मराठी मध्ये देऊ शकता.
 • याच्या नंतर select at least one  नावाचा पर्याय दिलेला असेल , ज्या मध्ये आपल्याला फॉरेस्ट विंग किंवा वाइल्ड लाइफ विंग आपल्या ला सिलेक्ट करायचे तुमच्या जवळ जर अभयारण्य असेल तर त्या वाईल्ड लाईफ हा पर्याय निवडावा. आणि जर तुमच्या जवळ फॉरेस्ट डिविजन असतील तर फॉरेस्ट्री विंग  निवडायची आहे.
 • आता फॉरेस्ट मिळवल्या नंतर पुढे आपल्या ला जिल्हा निवडा वा लागणार आहे. जिल्हा निवडल्या नंतर आपला जो तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्या नंतर आपली जी काही फॉरेस्ट डिविजन असेल त्याची निवड करायची आहे जिल्ह्या मध्ये ज्याच्या फॉरेस्ट विंग आहेत त्या ठिकाणी दाखवले जातील आणि त्याच्या मधून आपली फोर्स विंग निवडायचे. जर अभयारण्याच्या परिसरात ली आपलं गाव येत असेल तरी आपल्या ला वाइल्ड लाइफ एरिआ निवडा वा लागणार आहे. यानंतर आपल्या गावा चे नाव निवडायचे आहेत. गावाचे नाव निवड करताना एक अडचण येऊ शकते यामध्ये बऱ्याच वेळा गावा चे नाव येत नाही. अशा परिस्थिती मध्ये जर गावा चे नाव येत नसेल तर खाली एक पर्याय दिलेला असेल, की जर गावाचे नाव संगणक घेत नसेल तर पुढे दिलेल्या रकान्यामध्ये आपल्या गावा चे नाव एंटर करा.  फक्त आपल्या ला इंग्लिश मध्ये आपल्या गावा चे नाव एंटर करायचे आहे . त्यामुळे गाव असेल तर निवडायचे नसेल तर पुढे दिलेल्या रकाण्यामध्ये मध्ये आपल्या गावा चे नाव  एंटर करायचे आहे .
 • त्याच्या नंतर पुढे आपल्याला पत्ता टाकायचा आहे तो पत्ता देखील  फक्त मराठी मध्ये असायाला हवा . पत्ता जर येत नसेल तर  तो सुद्धा पण वरती सपोर्ट घेऊन किंवा इतर कीबोर्ड च्या माध्यमातून या टाइप करून या मध्ये पेस्ट करू शकता. पत्ता दिल्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पिकांची नुकसान झालेली तारीख निवडायची आहे.
 • आता ज्या तारखेला पिकांचे नुकसान झाले आहे.त्या तारखेपासूनच्या 48 तास आधी आपल्याला अर्ज करायचा आहे. त्यानंतर बँकेच्या खात्याची माहिती देणे महत्वाचे आहे अर्जदारांच्या बँकेचं नाव काय आहे? त्याची ब्रँच कोणती आहे? त्याचा अकाऊंट नंबर काय आहे? त्याच्या नंतर जो काही आपला आय एफ सी कोड असेल तो काळजीपूर्वक भरावा ही संपूर्ण माहिती आपल्याला न चुकता त्याच्या मध्ये व्यवस्थित भरायची आहे. पूर्ण माहिती भरून झाल्यावर माहिती भरलेलं सर्व फॉर्म एकदा व्यवस्थित बघूनच सबमिट करावा.
 • त्याच्या नंतर आपल्या ला डॉक्युमेंट त्याचे डॉक्युमेंट पूर्णपणे पीडीएफ स्वरुपा तील असावेत. यामध्ये पहिल्या डॉक्युमेंट आपल्या बँकेच्या पासबुक ची प्रत अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावा लागणार आहे आणि त्याच्या मध्ये जर सामाजिक क्षेत्र असेल तर सामाजिक क्षेत्रासाठी ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा जोडा वा लागणार आहे. याचा एक नमुना देण्यात आले ला आहे. हणून आपल् या ठिकाणी डाउनलोड करायचे त्या ची प्रिंट काढाय चे जे शेतकरी सामायिक खातेदार असतील त्यांचे नाव लिहून त्यांच्या सह्य़ा घेऊन हा नमुना देखील आपल्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे हे फक्त सामाजिक क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी ही लागणार आहे.
 • त्याच्या नंतर पुढचा टप्पा महत्वाचे आहे. त्या मध्ये आपल्या सर्व्हे नंबर कॉलम  मध्ये नुकसान झालेल्या सर्वे नंबर चा सातबारा ठिकाणी पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करावे लागणार आहे. यासाठी ई – पीक पाहणी केलेली असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ई – पीक पाहणी करा. पिकांच्या नोंदी जर सातबारा असतील तर ते उत्तमच आहेत. याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड आपल्या ला एंटर करायचा आणि खाली सबमिट नावा चे एक ऑप्शन दिलेले  आहे त्यावर सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल. आपण भरलेला अर्ज आपल्या त्या ठिकाणी दाखवला जाईल. त्यात नाव अर्ज क्रमांक, कशासाठी आपण अर्ज केला आहे, हे तिथे दिसेल आणि नंतर सर्व अर्जाची खात्री करूनच त्या अर्जाची प्रिंट काढून घ्यायाची आहे
 •  वरील काढलेली प्रिंट आपल्याला वन विभागात सबमिट करावी लागणार आहे. याच सोबत दिलेली कागदपत्रे वगैरे सर्व आपल्या ला दाखवली जाणार आहेत. त्याची प्रिंट काढण्यासाठी वरती आपल्याला ऑप्शन दिलेले आहे कि प्रिंट करा म्हणून आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या ला जर पुन्हा प्रिंट काढायची असेल किंवा अर्जासंबंधित काही स्टेटस पाहायचे असेल तर पब्लिक सर्विस च्या अंतर्गत आर्ट ट्रेकर वरती क्लिक करून आपण पाहू शकता. यामध्ये आपल्या ला नुकसानी चा प्रकार निवडायचा हे आपण पूर्वी निवडलेला आहे. त्याच्या नंतर आपण जो अर्ज केला आहे त्या अर्जा चा नंबर आहे. आपल्या एंटर करायचा आहे आणि  नंतर शोधा वरती क्लिक केल्यानंतर आपण केलेला अर्ज आपल्या ठिकाणी दाखवला जाणार आहे. त्याची स्थिती देखील आपण याठिकाणी पाहू शकता याचे प्रिंट काढून आपल्या जवळच्या वन विभागाच्या कार्यालया मध्ये आपण जमा करू शकता.
 • प्रिंट जमा केल्यानंतर तुमच्या नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा केला जाईल आणि त्याच्या नंतर जे काही नुकसान भरपाई ची रक्कम निश्चित होईल ती नुकसान भरपाई ची रक्कम तुमच्या खात्या मध्ये क्रेडिट केली जाईल. आता ही नुकसानभरपाई ची रक्कम किती असेल हे त्या त्या पिकावर अवलंबून असेल.                     अशा प्रकारे जर वन्य प्राण्यांमुळे तुमच्या शेतीच किंवा काही मनुष्य हानी किंवा दुखापत झाली असेल  तर हतबल न होता आपल्या या नुकसाना ची भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करा. शासनाच्या योजनाचा फायदा घ्या. आणखी काही अश्याच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद……

Spread the love
Posted in Uncategorised

One thought on “वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे नुकसान होतय,तर अश्या प्रकारे मिळेल नुकसान भरपाई!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *