शेतकऱ्यांनो ,पारंपारिक शेती करणे सोडा, फक्त हे गवत लावा, एकदा लावले कि सलग 5 वर्षे उत्पन्न सुरु, उत्तम असे बहुवार्षिक पिक..

Spread the love

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अश्या पिकांन बद्दल माहिती देणार आहोत कि जे एकदा शेतकऱ्यांनी लावले कि कमीत कमी पाच वर्षे तरी त्यापासून उत्पन्न सुरु राहील. मित्रांनो शेतकरी वर्ग कायमच शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तोट्यात राहिलेला आहे तोट्यात राहण्यामागचे अनेक कारणे आहेत, कोरडवाहू जमीन अनियमितपणे असलेला पाऊस, उत्पादित केलेल्या पिकांना नसणारा भाव आणखी बरेच कारणे सांगता येतील. तसेच आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजे पारंपरिक शेती. 

 

 

शेतकरी मित्रांनो सध्या वातावरण बदलामुळे पावसाचे प्रमाण देखील अनियमित झालेले आहे पूर्वीच्या काळी नक्षत्र बदलाप्रमाणे पाऊस हा भरोश्याचा होता किंवा ऋतू नुसार पाऊस ठरला जात होता. परंतु सध्याचे वातावरण व काळ वेगळा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून दुसऱ्या पिकांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. सर्वसाधारण शेती करायची म्हणलं कि दोन हंगाम येतात खरीप आणि रब्बी शेतकरी या दोन्ही हंगामात पिके घेतात यात काय होत तर प्रत्येक 5 महिन्याला किंवा 6 महिन्यानंतर चालू पिक काढून परत शेतीच्या मशागतीचे काम करावे लागते. वारंवार शेत नांगरणे, शेत फवारणे, शेतातील विविध कामांसाठी मंजूर लावणे, यामध्ये कमी कालावधीची पिके असल्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च देखील वाढतो तसेच ही मशागतीची प्रक्रिया   वर्षातून दोनदा ते तीनदा करणे भाग पडते यामुळे शेतीचा उत्पन्न खर्च वाढतो आणि त्या तुलनेने शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नाही. यामुळे पैसेही वाया जातात आणि शेतीसाठी केलेली मेहनत ही वाया जाते. शेतकऱ्यांचे हे जर नुकसान टाळायचं असेल तर असे पीक लावणे आवश्यक आहे जे की आपण एकदा लावले तर त्या पिकाने  सलग चार ते पाच वर्ष उत्पन्न दिले पाहिजे. त्या पिकासाठी परत परत नांगरणी  करायची गरज नाही परत परत शेत तयार करायची गरज नाही असे पीक लावण्याची गरज आहे

 

चला तर मग शेतकरी मित्रांनो आता आपण प्रमुख तीन पिके बघणार आहोत की जी लावल्यानंतर कमीत कमी चार ते पाच वर्ष त्या पिकापासून उत्पन्न मिळत राहिले पाहिजे.

 

1. गवती चहा (Lemon Grass)

 

गवती चहा म्हणलं की तुम्हाला चहा आठवला असेल आणि चहा मध्ये गवती चहा टाकून  बरेच लोक चहा करत असल्याची कल्पना येत असेल परंतु याचा वापर फक्त चहा मध्ये होत नसून विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये विशिष्ट प्रकारची चव येण्याकरिता म्हणजे एखाद्या पदार्थाला फ्लेवर देण्यासाठी याचा वापर केला जातो. गवती चहाचा सर्वाधिक वापर साबण बनवण्याकरता देखील केला जातो तसेच विविध प्रकारचे सौंदर्य साधने, अत्तरे वैद्यकीय औषधी मध्ये बघायला गेले तर विटामिन ए बनवण्यासाठी याचा वापर होतो

 

गवती चहाची लागवड कधी करावी?

 

गवती चहाची लागवड कधीही करू शकता फक्त लागवड करताना जास्त उष्णता व जास्त थंडी असू नये फेब्रुवारी – मार्च, जून – जुलै, ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत लावण्यास काही हरकत नाही जास्तीत जास्त फेब्रुवारी – मार्च या दोन महिन्यात गवती चहा लावण्याचा प्रयत्न करावा. गवती चहाची लागवड करताना लागणारी माती सर्वसाधारण मध्यम ते चांगल्या प्रकारचे असावी याच्यासाठी लागणारा पीएच (PH ) 5 ते 8.5 पर्यंत असावा   याच्या उत्पन्नाचे बघायचे झाले तर गवती चहा हे एक बहुवार्षिक आहे. एकदा गवती चहा लावला की पुढील पाच वर्ष ते उत्पन्न देत राहते लागवडीच्या चार महिन्यानंतर याची पहिली कापणी होते वर्षभरात गवती चहा या पिकाच्या साधारण तीन कापण्या होतात

गवती चहाची लागवड ही रोपे लावून करता येते साधारण एका एकर मध्ये गवती चहाची 25 हजार रोपे लावता येतात ही रोपे लावताना दोन बाय दोन (2*2) दीड बाय दोन (1.5*2) दीड बाय दीड  (1.5*1.5) अशा पद्धतीने लावता येतात. याची विक्री तेल काढून किंवा ड्राय पद्धतीने सुद्धा करता येते तेल काढून विकणे थोडे खर्चिक होईल त्यापेक्षा वाळवून ते साठवून विकणे फायद्याचे ठरेल याला भरपूर चहाच्या कंपन्या  अत्तराच्या कंपन्या यांच्याकडून भरपूर मागणी असते गवती चहा एकरी वार्षिक पाच टनापर्यंत उत्पन्न देऊ शकते म्हणजे जवळपास एकरी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत यापासून उत्पन्न मिळू शकते.

 

2.सिट्रोनेला गवत ( Citronela Plant )

 

सिट्रोनेला  हे नाव ऐकलंच असेल.सिट्रोनेला या गवताचा वापर डास पळवण्यासाठी, जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी तसेच विविध अत्तर आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थात याचा वापर केला जातो.सिट्रोनेला गवत आणि गवती चहा या मध्ये बऱ्यापैकी साम्य आहे.

 

* सिट्रोनेला गवताची लागवड कशी व कधी करावी?

 

सिट्रोनेला गवताची लागवड देखील गवती चहा सारखीच केली जाते. वर्षातील कोणतेही ऋतू मध्ये लागवड करता येते. फक्त अति उष्ण आणि अति थंड वातावरण अशा कालावधी मध्ये याची लागवड करू नये सिट्रोनेला गवताच्या कालावधी साठी सर्वात योग्य कालावधी हा 15 फेब्रुवारी ते मार्च पर्यत चा मानला जातो हे सुद्धा बहुवार्षिक पीक आहे साधारण  हे पिक लावल्यानंतर तीन ते पाच वर्ष याचे उत्पन्न सुरु राहते यासाठी भारतातील कुठल्याही वातावरण चालते सिट्रोनेला गवतासाठी जमिनीचा पीएच (PH) साडे पाच ते सहा असावा (5.5 ते 6 ) जरी जास्त PH असला तरी काहीही हरकत नाही. यासाठी देखील गवती चहा सारखेच एकरी पंचवीस हजार रोपे लागतात. रोपे लावतानी ( 2*2 ) किंवा ( 2*2.5 ) अश्या प्रकारे लावावीत. दर 3 महिन्यांनी याची कापणी करावी लागते वर्षातून चार वेळेस याची कापणी करावी लागते. या गवताचे फक्त तेल काढले जाते सिट्रोनेला गवत हे गवती चहा सारखे वाळवून याची विक्री करता येत नाही एवढाच ह्या पिका मध्ये कमीपणा आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही याचे तेल काढायचे झाल्यास एकरी वार्षिक पहिल्या वर्षी 100 किलो तेल निघते तर दुसऱ्या वर्षी 150 किलो पर्यंत तेलाचे उत्पन्न निघू शकते यासाठी पहिल्या वर्षी एकरी चाळीस हजार खर्च येतो तर दुसऱ्या वर्षी तोच खर्च एकरी पंधरा हजार एवढा येतो उत्पन्न चा विचाराल तर एकरी दीड ते दोन लाख उत्पन्न याच्या पासून मिळते.

 

3.पामारोजा गवत ( Cymbopogon martinii )

 

पामारोजा हे गवत असं आहे कि गुलाबांच्या फुलांचा जो काही वापर आहे ते करण्यासाठी प्रत्येक वेळेस गुलाबाचे फुल वापरणे खर्चिक होऊ शकते यासाठी एका वेगळा पर्याय म्हणून पामारोजा गवताचा वापर केला जातो या गवताचा सुगंध गुलाबा सारखाच येतो त्यामुळे याचा वापर साबण तयार करणे किंवा औषधं तयार करणे या साठी होतो सर्वात जास्त याचा वापर अत्तरे तयार करण्यासाठी व सुगंधी  सौंदर्य प्रसादने बनवण्यासाठी होतो. याची लागवड गवती चहा सारखीच केली जाते फेब्रुवारी ते मार्च, जून जुलै मध्ये उत्तम कालावधी असतो पामारोजा गवताच्या लागवडी साठी तसेच यासाठी लागणार जमिनीचा PH हा 7 ते 8 असला तर उत्तमच. याची लागवड दोन पद्धतीने करता येते. बी लावून आणि नर्सरी तून रोपे तयार करून.

 

बियाणे वापरून शेती करायची म्हंटल तर एकरी 8 किलो बियाणे लागेल तर याचा भाव प्रति किलो 1200₹ आहे तर रोपे तयार करून 2 किलो एवढे बियाणे लागेल याचे लागवडीचे अंतर दोन बाय दोन ( 2*2 ) दीड बाय दीड ( 1.5* 1.5 ) तुमच्या जमिनीनुसार लावावे. पहिल्या वर्षी यांच्या दोन च कापण्या होतात तर पुढील चार ते पाच वर्षें तीन ते चार कापण्या ह्या वार्षिक होतात. याचे सुद्धा आपल्याला तेल च काढावे लागते. पहिल्या वर्षी तेलाचे उत्पादन 50 ते 80 किलो तर दुसऱ्या वर्षी 80 ते 120 किलो उत्पन्न निघते याच्या साठी पहिल्या वर्षी खर्च 30 ते 40 हजार रुपये येतो दुसऱ्या वर्षी याचा खर्च 15 ते 20 हजार रुपये येतो. पहिल्या वर्षीपासून दीड लाख रुपये उत्पन्न मिळते तर दुसऱ्या वर्षापासून अडीच ते तीन लाख रुपये एवढे उत्पन्न मिळते

 

शेतकरी मित्रांनो पारंपरिक शेती पासून अगोदर चांगले उत्पन्न मिळत होते परंतु सध्या वाढलेली महागाई, बी बियाणांचे वाढलेले भाव, बे भरवश्याचा पाऊस  या मुळे कुठे तरी शेती करण्याच्या पद्धती मध्ये बदल केला गेला पाहिजे व लोक जे करतात त्याच्या पेक्षा थोडं वेगळं आपण केल पाहिजे. आम्ही वरील दिलेले पर्याय हे उत्तम च आहे याचा सुरुवातीला थोड्या प्रमाणात गवत लावून एका प्रयोग करून बघावा. त्या प्रयोगाला यश आले तर मोठ्या प्रमाणात या गवतांची शेती करण्यास काहीही हरकत नाही. अशे वेगवेगळे प्रयोग केले तर निश्चितच शेतकरी राजाची परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही धन्यवाद…..

 

 

 


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *