पाणी कधी प्यावे? समज /गैरसमज

Spread the love

नमस्कार मित्रांनो,  आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वस्त आणि मस्त हे राहिलंच पाहिजे आणि स्वस्थ राहण्यासाठी आपल्या ला  आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष दिले गेले पाहिजे.  आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही साधारण माणसाच्या शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असते. या पाण्याच्या बदलामुळे देखील आपण कित्येक वेळेला  आजारपणाला आमंत्रण देतो त्यातच आपल्याला प्रत्येकाला एक प्रश्न सतत सतावत असतो कि असते  की जेवणा अगोदर पाणी प्यावे? जेवणा नंतर पाणी प्यावे? कि जेवणा च्या मध्यभागी पाणी प्यावे? या मध्ये बरेच जण हेल्दी राहण्यासाठी काय करतात तर जेवणाच्या मध्ये अजिबात पाणी  पाणी पीत नाही. जेवण पूर्ण झाल्याच्या नंतरच पाणी पितात. काही जणांना जेवणा नंतर पाणी पिणे फायद्याचे असते असे वाटते काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही जेवताना थोडं-थोडं पाणी पितो आणि जेवणा च्या नंतर आम्ही पाणी पीत नाही आणि काहीजण तर असं म्हणतात की आम्ही जेवणाच्या अगोदर पाणी पिऊन घेतो या तिन्ही पर्यायापैकी कधी पाणी पिणं गरजेचं आहे, कधी पाणी पिणं आरोग्यादाई असते. तसेच तुम्ही कधी पाणी प्यायलात, तर शरीरात कसा परिणाम होतो? या तिन्ही पर्यायामध्ये आपल्यात बरेच समज/गैरसमज आहेत ते देखील थोडे का होईना दूर करण्याचा प्रयत्न करू…

तर सर्वात अगोदर आपण जेवणाच्या पूर्वी पाणी पिल्यास काय होईल त्याच्या विषयी माहिती घेऊयात.

जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायलं तर काय होतं?

आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये या गोष्टीबद्दल माहिती सांगितली आहे.  आयुर्वेदामध्ये  एक महत्वाची संहिता म्हणजे अष्टांग संग्रह. अष्टांग संग्रह या ग्रंथा मध्ये असे सांगितलं आहे कि जि एखादी व्यक्ती जेवण करण्याअगोदर  पाणी पिते  त्यावेळी जि जठर अग्नी असते ती मंद होते त्याने आपल्याला भूक कमी लागते आणि  त्याचबरोबर आपलं जे अन्न पचन होण्याचं जे काम असतं ना ते कुठे तरी मंद होताना दिसते आणि या सर्वांचा परिणाम वजनावर झालेला पाहायला मिळतो आपली पाचन शक्ती बिघडल्याने आरोग्य विषयी अनेक समस्या ना तोंड द्यावे लागते तसेच या मुळे आपले वजन देखील बऱ्यापैकी कमी होते. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की  माझं वजन आधीच जास्त आहे कमी झाले ला चांगलंच आहे ना….परंतु एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे कि या मुळे आपली पचन क्रिया बिघडत आहे हे देखील लक्ष्यात ठेवायला पाहिजे. आपली जि जठर अग्नी भूक लागल्याने उत्पन्न होत असते त्या अग्नी ला आपण जेवणा अगोदर पाणी पिऊन विजवून टाकत आहोत याचा विचार केला पाहिजे आणि यामुळे आपलं पचन कुठे तरी बिघडते आहे म्हणजे आपली पचनशक्ती आहे ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि त्याच्या मुळे वजन कमी होणे हे योग्य नाही. मान्य आहे कि लठ्ठपणा असेल तर तो कमी झाला पाहिजे  पण त्याचबरोबर आपली अग्नी सुद्धा चांगली पाहिजे तर ते वजन जास्त काळ कमी होऊन टिकून राहू शकते आणि तुम्ही आरोग्यदायी राहू शकता. पण जर तुम्ही अग्नी मंद करून वजन कमी करत असाल तर ते काही योग्य नाही . त्यामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथा मध्ये सांगितलं आहे कि जेवण करण्यापूर्वी पाणी पिणे योग्य नाही ते पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे.

जेवण झाल्यानंतर पाणी पिल्याने काय होतं?

काही लोक असे असतात की आरोग्यदायी राहण्यासाठी जेवताना अजिबात पाणी पित नाही ते जेवणा नंतर पाणी पितात. पण आता यामागे शास्त्र काय आहे? जेवणानंतर पाणी पिल्याने शरीरात काय परिणाम होतो याची जरा माहिती घेऊ. आयुर्वेदच्या अष्टांग संग्रह या संहितेत असे सांगितले आहे कि जे लोक जेवण झाल्यानंतर पाणी पितात त्यांच्या मध्ये स्थूलता वाढण्याचा धोका असतो. शरीराचे वजन वाढते तसेच छातीमध्ये कफ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जेवणानंतर पाणी पिणे अयोग्य असल्याचे या संहितेत म्हंटले आहे.. आता काही जण जे  असे पुरुष असतात कि त्यांना वाटतं की वजन वाढण्या साठी जेवताना पाणी नाही पिलो आणि जेवण झाल्यावर पाणी पिलो तर माझं वजन वाढण्यास मदत होईल पण ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी फक्त वजन वाढवण्याचे टार्गेट नसायला पाहिजे तर आरोग्यदायी राहून वजन वाढणे गरजेचे आहे.प्रतिकार शक्ती देखील वाढणं गरजेचं आहे नाहीतर वजन वाढणार, त्याच्या मेधधातू वाढणार आणि  मंग स्थूलता वाढणार आणि असे जे वजन वाढेल ना ते हेल्दी नसते.ज्या वेळेला आपल्याला वजन कमी करायचे किंवा वजन वाढवायचे असेल त्यावेळी हेल्दी राहूनच वजन वाढवायचं किंवा कमी करायचं कि जेणेकरून शरीरावर कोणतेही वाईट परिणाम होणार नाही. आपली प्रतिकार शक्ती चांगली राहील त्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. हे सर्व केव्हा शक्य होईल तर ज्यावेळी आपला अग्नी व्यवस्थित असेल मजबूत असेल, आपली पचनशक्ती चांगली असेल, चयापचय क्रिया चांगली असेल. शरीरातील चयापचय क्रिया ही सर्वात महत्वाची आहे मंग तुम्हाला वजन वाढवायचे असो वा कमी करायचे असो.

जेवणाच्या मध्यभागी पाणी पिल्याने काय होतं?

ज्यावेळी आपण जेवण करत असताना मधे मधे पाणी पितो त्या वेळेला आपली जी सात धातू असतात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र धातू . हे धातू चांगल्या प्रकारे म्हणजे एक समान पद्धतीने वाढतात आणि आपली जी पचन शक्ती असते ही चांगली होण्यास मदत होते आणि आपण जे अन्न घेतो ते समान पद्धतीने त्या अन्नाचं पचन होते, म्हणजे जेवण करत असताना मध्ये जर तुम्ही पाणी पीत असाल तर जी शरीराची वाढ होती ती समप्रमाणात होते, ना-अतिप्रमाणात ना-कमी प्रमाणात म्हणजे  दोन्ही ही समान प्रमाणात असायला हवे. शरीर जास्त लठ्ठ पण नसायला पाहिजे जास्त बारीक पण नसायला पाहिजे.आपलं  शरीरातील सर्व धातू हे समान असली पाहिजेत. मग हे कधी शक्य होत? तुम्ही जेवण करत असताना जेवणाच्या मधे  पाणी पीत असाल तर ते शक्य होऊ शकतं. आता जेवताना मध्ये मध्ये जास्त  पाणी प्यायचे नाही. तुम्ही एकदाच पाणी प्या असं नाही. मित्रांनो, अंदाजे 100 ते 150 मिली पाणी घ्या आणि जेवणाचे आपण ज्या वेळेला घास घेत असतो त्या वेळेला मध्ये कधीतरी आपल्याला थोडसं पाणी प्यासे वाटते किंवा  ज्यावेळी अन्न खाली जात नसत अश्या काही वेळेला एक घोट पाणी तुम्ही पिऊ शकता आणि पूर्ण जेवणामध्ये तुम्ही थोडे थोडे पाणी  घ्या पण एकदमच पाणी पिऊ नका. जेवण पूर्ण झाल्याच्या नंतर पाणी कधीही पिऊ नका. जेवण झाल्यानंतर  तुम्ही थोडी शतपावली करू शकता. जास्त नाही पण थोडं फिरून येऊ शकता कि जेणेकरून तुमचं पोट तुम्हाला जास्त भरल्यासारखे वाटू नये शतपावली केल्यानंतर तुम्ही 45 ते 50 मिनिटे झाल्यानंतर पाणी पिऊ शकता ते पण तुम्हाला तहान लागली असेल तरच.

यात आणखी एक महत्वाचे जेवताना कोणते पाणी  प्यायले पाहिजे गरम पाणी प्यायले पाहिजे? कि थंड? तर मित्रांनो पाणी थंड प्यावे कि गरम हे त्या त्या ऋतू नुसार ठरवले गेले पाहिजे. जसे कि समजा वसंत ऋतू सुरु होणार आहे या ऋतू मधे वातावरण थंड असते यामुळे शरीरामध्ये कफ होण्याचे प्रमाण जास्त असते त्यावेळी कोमट पाणी पिणे गरजेचे असते. तसेच उन्हाचे दिवस असतील उन्हाळा सुरु असेल तर थंड  माठातले पाणी प्यावे रिफ्रेजीरेटर मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे तसेच ज्या वेळी ऑक्टोबर हिट असते त्यावेळी शरीरातील उष्णता वाढत असते आणि त्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढत असते त्यावेळी थंड पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते.

तसेच पाणी पिण्याचे प्रमाण नेमके किती असावे?

मित्रांनो…. या बाबत देखील अनेक गैरसमज आहेत पाणी पिण्याचे असे काही प्रमाण नाही आहे. जेवढी तहान लागलेली असेल तेवढे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. ऋतुनच्या बदला मुळे पाणी पिण्याचे प्रमाण सतत बदलत असते त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण ठरवलेले नसते.

पाणी पिण्याबाबचे अश्या प्रकारे अनेक समज गैरसमज आहेत कोणी म्हणतं जेवणाआदी पाणी प्यावे कोणी म्हणतं जेवणानंतर कोणी म्हणतं जेवणाच्या मधे.. आपण ज्याप्रकारे वरती पाणी पिण्याबाबत ची माहिती दिली आहे ती पूर्णपणे आयुर्वेदामधे जो काही उल्लेख आढळतो त्या प्रमाणे दिली आहे. आयुर्वेद हा खूप प्राचीन ग्रंथ आहे. त्यामुळे या माहितीवर किती विश्वास ठेवायचा हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. धन्यवाद……


Spread the love
Posted in Uncategorised

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *