Share Market विषयी थोडं…..

Spread the love

Share Market :- आजच्या महागाईच्या जमाण्यात  आणि कोरोना नंतरच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा एका व्यवसायावर अवलंबून न राहता Life secure करण्यासाठी  Second Earning चे वेगवेगळे स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात महत्वाचे म्हणजे अनेक तरुण/तरुणी तसेच वयस्क लोक सुद्धा स्टॉक मार्केट हा व्यवसाय म्हणून निवडताना दिसत आहे. निश्चित स्टॉक मार्केट हा व्यवसाय एक चांगला पर्याय असू शकतो परंतु काही लोक हे कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेता माहिती न घेता कोणाच्या तरी सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट करून बसतात आणि स्वतः च नुकसान करून घेतात.

आम्ही headlinetodays या वेब page मार्फत आपणास स्टॉक मार्केट विषयी माहिती पुरवणार आहोत कि जेणेकरून आपल्या मराठी बांधवाना स्टॉक मार्केट विषयी थोडे Knowledge देता यावे. अनेकांना वाटतं स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा बाजार जो कोणी त्यात इन्व्हेस्टमेंट करतो किंवा ट्रेडिंग करतो तो कायमच लॉस मध्ये असतो असं काहीही नाही मित्रानो तुम्ही जर प्रॉपर knowledge घेऊन या क्षेत्रात उतरलात तर हे चित्र काही वेगळं दिसेल याची ग्यारंटी देतो. पण तुम्ही जर तुमच्या मित्रांचे Profit चे स्क्रीनशॉट बघून किंवा कुठंतरी youtube म्हणा किंवा टेलिग्राम वरील ग्रुप मधील मोठं मोठे profit चे स्क्रीनशॉट बघून जर या क्षेत्रात आलात तर तुमचा लॉस च होणार हे नक्की…..लॉस किंवा प्रॉफिट हा या व्यवसायाचा एक भाग आहे पण प्रॉपर risk Managment ही यायलाच हवी नाहीतर तर तुम्ही लॉस मध्ये असणार हे मात्र खरंय

सर्वात महत्वाचे म्हणजे SEBI च्या मार्च 2023 च्या अहवालात एक धक्कादायकमाहिती समोर आली आहे त्यानुसार 89% लोक हे स्टॉक इंडेक्स मध्ये लॉस मध्ये आहे तर ऑपशन ट्रेडिंग मध्ये 99% लोक हे लॉस मध्ये आहेत तर फक्त 1% लोक प्रॉफिट मध्ये आहेत ही सुद्धा गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे म्हणजे बघा जे लोक 5 लाख,10 लाख  1कोटी अशी जी प्रॉफिट दाखवतात ती किती प्रमाणात खरी असतील हे त्यांनाच माहिती आणि जरी खरी असतील तरी ते लोक फक्ट प्रॉफिटचे च स्क्रीनशॉट share करतात लॉस झालेला कधीच दाखवणार नाहीत पहिल्यांदा तर अश्या लोकांपासून सावध  राहायला पाहिजे

चला तर मित्रानो आपण एक प्रामाणिक प्रयत्न करू कि जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजाव्यात काही गोष्टीनच ज्ञान मिळेल आणि त्यातून तुम्ही काही प्रमाणात शिकून थोडी earning करू शकाल ही खात्री बाळगतो भेटू पुन्हा पुढच्या blog मध्ये नवीन माहिती घेऊन…..


Spread the love
Posted in Uncategorised

2 thoughts on “Share Market विषयी थोडं…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *