पावसाळ्यात फिरण्यासाठी चे 10 सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Spread the love

मित्रांनो…. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तुम्ही हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी कोठे न कुठे पर्यटन स्थळी जाण्याचे ठरवले असेल किंवा ठरवणार असणार हे  तर नक्कीय. पावसाळ्यात मस्त पैकी फिरण्याची मज्याच वेगळी असते. आपल्या महाराष्ट्र राज्याला तर नैसर्गिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील असे राज्य आहे  कि ज्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे.महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशातून / परदेशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक पर्यटणासाठी येत असतात. परंतु महाराष्ट्र राज्यातील काही लोकांना पर्यटनाचे ठिकाण माहित नसते. चला तर मग आपण पाहुयात 10 पर्यटनाचे ठिकाणे –

  1. लोणावळा/खंडाळा : मुंबई – पुणे महामार्गांवर घाटाच्या  मध्यावर असलेली ही दोन लोकप्रिय अशी पर्यटनाचे ठिकाणे आहेत. मुबंई – पुण्यातील लोकांसाठी तर एकदम जवळचे व सोईचे ठिकाण आहेत अनेक मुबंईकर पुणेकर प्रत्येक आठवडायच्या शनिवार/रविवारी या दोन पर्यटन स्थळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात टायगर पॉईंट, भुशी डॅम,वाळवंट डॅम, पवना तलाव ही लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाण आहेत. तसेच खंडाळा पासून चार किलोमीटर अंतरावर सुनील वॅक्स नावाचे एक प्रसिद्ध मुजिअम आहे तिथे जगप्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, अभिनेते यांचे मेनाचे पुतळे पाहवयास मिळतात.
  2. आंबोली : आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हातील अतिशय सुंदर आणि रमनीय ठिकाण आहे. या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा आंबोली येथे पडतो. आंबोली मधील धबधबे हे उंचावरून कोसळताना बघणे ह्यात एक वेगळालाच आनंद असतो.
  3. माथेरान : माथेरान हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे पावसाळ्यामध्ये डोंगरानमधून ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, पावसाळी धुके, हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत असतो. माथेरान चे प्रमुख आकर्षण म्हणजे या ठिकाणचा शारलोट तलाव हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास ओसंडून वाहणारा धबधबा मनाला मोहून टाकतो.
  4. ठोसेघर धबधबा : ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रातील प्रमुख असा धबधबा आहे. ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यात आहे. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारा हा धबधबा जून आणि जुलै महिन्यात सुरु होतो या दोन महिन्यात पर्यटकांची येथे वर्दळ पाहायला मिळते. हा धबधबा सुमारे 150 मीटर ते 180 मीटर एवढा उंच असून हा धबधबा तारळी या नदीवर आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि धबधबा पाहण्यासाठी पर्यटक ठोसेघर येथे येत असतात. सातारा या मुख्य शहरापासून ठोसेघर धबधबा 27 किमी अंतरावर आहे.ठोसेघर धबधबा हा पश्चिम घाटातील प्रमुख धबधबा समजला जातो.
  5. भंडारदरा : भंडारदरा हे सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गरम्य असे थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण प्रवरा नदी काठी वसलेले आहे. भंडारदरा या ठिकाणी अनेक डोंगरझाडे, तलाव, शुद्ध हवा, धबधबे पाहवयास मिळतात, या ठिकाणी भंडारदरा धबधबा आणि रंधा धबधबा हे दोन धबधबे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.अकोले येथे अगस्त ऋषीं चे आश्रम प्रसिद्ध आहे हे भंडारदरा पासून हे ठिकाण 40 किलोमीटर अंतरावर आहे.रावणाचा वध करणारा बाण प्रभू श्री रामा ला भेट देणारे अगस्त ऋषीं होते अशी अख्यायिका आहे. तसेच घाटघर येथील कोकण कडा, हरिश्चंद्र गड, रतनगड किल्ला, अमृतेश्वकर मंदिर, ऑथॉर लेक तलाव अशी विविध पर्यटन स्थळे भंडारदरा येथे पाहवयास मिळतील. भंडारदरा हे ठिकाण अहमदनगर जिल्यातील अकोले तालुक्यात येते.
  6. भीमाशंकर : भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यात येते मुख्य पुणे शहरा पासून शंभर किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थान आहे.या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल आणि तीर्थस्थान असल्याने हे ठिकाण देखील पर्यटकांच्या पसंतीचे आहे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक आहे तसेच येथे भीमा नदीचा उगम स्थान आहे. भीमाशंकर हे वन्यजीव प्राण्याच्या अभयारण्यसाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे.येथील अभयारण्यात रानमांजर, सांबर, रानससा, बिबटया, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात येथील विशेष  प्राणी म्हणजे उडणारी घार ही घार फक्त भीमाशंकर या अभयारण्यात पाहवयास मिळते.हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3250 मी उंच आहे त्यामुळे येथे पावसाळ्यात मनाला भारावून टाकणारे असे मनमोहक दृश्य असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सीतारामबाबा आश्रम, नागफनी हे ठिकाण पाहण्यासारखी आहेत.
  7. ताम्हणी घाट : सह्याद्री पर्वतःच्या पश्चिम घाटात वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हणी घाट….. ताम्हणी घाट पुण्यापासून 55 किमी अंतरावर आहे.पावसाळ्यात ताम्हणी घाटाचे निसर्गरम्य सौंदर्य बघण्यासारखे असते ताम्हणी घाटाकडे जाताना सर्वात प्रथम मुळसी धरण पाहावयास मिळते. मुळसी धरण आणि कोलाड यांच्या मधल्या भागात ताम्हणी घाट वसलेला आहे. मुळशी धरणाचे पाणी  पुणे जिल्ह्यातील सिंचणासाठी वापरले जाते. ताम्हणी घाटाच्या थोडे पुढे गेल्यास देवकुंड  नावाचा धबधबा आहे देवकुंड धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम आणि मनाला मोहून टाकणारे आहे. हा धबधबा पाहण्यासाठी ही पर्यटकांची गर्दी होत असते.ताम्हणी घाट जसजसे चधायला लागू तसतसे आपण या निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जातो डोंगरावर पसरलेले दाट धुके, नयनरम्य धबधबे, ढगांनी वेधलेल्या वाटा तसेच नागमोडी वळणाच्या वाटा….. ताम्हणी घाटाचे वर्णन हे शब्दात होऊ च शकत नाही.
  8. तापोळा : तापोळा या ठिकाणाला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते.तापोळा हे ठिकाण महाबळेश्वर पासून 25 किलोमीटर पुण्यापासून 130 किलोमीटर तर मुंबई पासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणची हिरवळ आणि सौंदर्य तुमच्या मनाला भारावून टाकेल. तसेच येथे असलेले वनक्षेत्र हे पर्यटकांना मोहित करते येथील ट्रेकिंग चा अनुभव एकदम भन्नाट आहे. तापोळा येथे शिवसृष्टी ऍग्रो टुरिसम नावाचे रिसॉर्ट आहे तिथे तुम्ही बुकिंग करून राहू शकतात तिथे एकूण 6 खोल्या आहेत. तिथूनच जवळ शिवसागर तलाव आहे हे तलाव पर्यटकानच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे येथील तलावात तुम्ही बोटींग करण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच तिथे तीन नद्याचा संगम पॉईंट देखील आहे.
  9. पाचगणी : पाचगणी पर्यटन थळ हे महाबळेश्वर इतकेच लोकप्रिय आहे पाचगणी हे एक थंड हवेचे ठिकाण आहे ते महाबळेश्वर पासून अवघे 20 किलोमीटर च्या अंतरावर आहे.पाचगणी या ठिकाणाला च पंच गणी या नावाने ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेतील पाच डोंगरांना पाचगणी हे णा देण्यात आलेले आहे तिबेटच्या पठरानंतर आशिया खंडातील सर्वात उंच पठार म्हणून याची ओळख आहे. पाचगणी हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. एका बाजूला टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला मैदानी किनारपट्टी असे विलोभनीय दृश्य पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांना अनुभवयास मिळते. इंग्रजांच्या काळात पाचगणीला उन्हाळ्यातील रिसॉर्ट म्हणून ओळखले जायचे आता देखील इंग्रजांच्या त्या काळच्या बऱ्याच वसाहती तेथे गेलेल्या पर्यटकांना बघायला मिळतात.दर्याखोऱ्यांनी नटलेल्या आणि नयनरम्य वातावरण असल्याकारणाने हिंदी चित्रपटसृष्टी ला देखील येथील निसर्गाची भुरळ पडते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या भागात होत असते. पाचगणी हे ठिकाण बोर्डिंग स्कूल साठी प्रसिद्ध आहे देशाच्या विविध भागातून या ठिकाणी विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.पाचगणी मध्ये पारशी आणि ब्रिटिश लोकांचे घरे बघण्यासारखी आहेत.तसेच येथील स्टोबेरी विशेष प्रसिद्ध आहे.पाचगणी पासून जवळच टेबल लँड,पाचगणीच्या गुहा,सिडणी पॉईंट, कमलगड, किंडीज पार्क अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तर तुम्ही नक्की पाचगणी या पर्यटन स्थळाला भेट द्या.
  10. माळशेज घाट : पावसाला सुरुवात झाली कि हिरवेगार डोंगर आणि उंचावरून वाहणारे धबधबे असे सुखावणारे वातावरण तयार होते.माळशेज हा घाट कल्याण -अहमदनगर या महामार्गांवर आहे. सर्वात जास्त पावसाळ्यात पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. माळशेज घाट हा पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात असला तरी बारा माही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. हिरवेगार उंच डोंगर आणि त्यावरून कोसळणारे पांढरे शुब्र धबधबे हे माळशेज घाटाचे आकर्षण मानले जाते.माळशेज घाट हा गिऱ्यारोहकांना देखील एक वेगळाच अनुभव देऊन जातो.पावसाळा संपल्यानंतर देखील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. माळशेज घाटाजवळ हरिश्चंद्रगड देखील आहे तो अवघे आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे

Spread the love
Posted in Uncategorised

3 thoughts on “पावसाळ्यात फिरण्यासाठी चे 10 सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *